Site icon HW News Marathi

“…त्यांनी एकत्र येऊ नये का?”, अजित पवारांची मनसे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संभाव्य युतीवरील प्रतिक्रिया

मुंबई | “सगळ्यांनी एकत्र यावे.  त्यांनी एकत्र येऊ नये का?, तुम्हाला वाईट का वाटते?”, अशी सूचक प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र येण्यावर दिली आहे. दिवाळीनिमित्ताने मनसेच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत. यावेळी पहिल्यांदाच राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती विशेष होती. यामुळे मनसे, शिंदे गट आणि भाजप यांची युतीच्या चर्चेला पुन्हा एका राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे दिवाळीसाठी बारामतीत गेले आहे.

पत्रकारांनी राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या एकत्र येण्यावर अजित पवार म्हणाले, “दिवाळीचा सण असून कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करत आहोत. यामुळे सगळ्यांनी एकत्र यावे.  त्यांनी एकत्र येऊ नये का?, तुम्हाला वाईट का वाटते?, दिवाळीच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावे. आणि एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, यात आक्षेप घेण्यासारखे काय कारण आहे? असे सूचिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिंदे सरकारच्या दिवाळीनिमित्ताने 100 रुपयांत शिधा योजनेवर अजित पवार म्हणाले, “ही योजना राबवत असताना त्यांची व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे. शिंदे सरकारने नियोजनशून्य कारभार केला आहे. यामुळे या सारख्या समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहे की काही नाही. दिवाळीनंतर शिधा सवलतीच्या दरात मिळून काय उपयोग आहे का?, त्यांचे मंत्री सांगत आहेत की शिधा पोहोयलाय. पण, शिधा पोहोचला नाही. काही जण बोलतात की त्याचा काळा बाजार सुरू आहे. कोण बोलते 100 रुपयांमधील शिधा कुणी 200 किंवा 300 रुपयांचा विकत आहे.”

 

 

 

Exit mobile version