June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

१४ जूनला होणार राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. येत्या १४ जूनला फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण सात जागा भरल्या जातील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चितपणे पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (९ जून) दिल्लीत बोलताना दिले होते. तर “येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल”, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील नुकतेच सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी (११ जून) दुपारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार बंडखोर नेत्यांसोबत चर्चा झाली. रणजितसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत. या ४ नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील तसेच अन्य जणांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या एकाच आमदाराला मंत्रीपद मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related posts

#RamMandir : निवडणुकीच्या काळातच राम राम करतात, नंतर आराम करतात !

News Desk

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील ४ जणांची प्रतिष्ठा पणाला !

News Desk

मराठा आरक्षणाबाबत बाहेर घोषणा करण्यापेक्षा सभागृहात विधेयक आणा !

News Desk