HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने करून दाखवले !

मुंबई | राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील ऐतिहासिक २५ गडकिल्ले हे हॉटेलिंग आणि लग्नसमारंभासाठी उपलब्ध करून देण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वच स्तरांतून तीव्र विरोध होत आहे. “औरंगजेबाला जे आपल्या उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने करून दाखवले. हा निर्णय अत्यंत संतापजनक आहे. आम्ही कधीही हे होऊ देणार नाही”, असे म्हणत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.

“शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे. याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर…”, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाप्रती संताप व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे”, असे ट्विट करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला आपला तीव्र विरोध दर्शविला आहे.

“महाराष्ट्रातले २५ गडकिल्ले आता हॉटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय वाचला आणि संताप अनावर झाला.. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दैदिप्यमान इतिहास हा आमचा फार मोठा ठेवा आहे, त्याचा बाजार करू नका”, अशी तीव्र प्रतिक्रिया मनसे नेते अनिल शिदोरे यांनी दिली आहे.

Related posts

#ElectionsResultsWithHW Live Updates : भाजपला स्पष्ट बहुमत, पुन्हा एका मोदी सरकार

News Desk

प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाने भाजप घाबरले !

News Desk

#PulwamaAttack : भारताच्या इतिहासातील जवानांवरील ‘हे’ सर्वात मोठे हल्ले

अपर्णा गोतपागर