HW News Marathi
राजकारण

माझ्याकडून काही चुकले असेल, कोणाला दुखावले असेल तर…! – मुख्यमंत्री

मुंबई | “माझ्याकडून काही चुकले असेल किंवा कोणाला दुखावले असेल तर मला माफ करा. माझ्याच लोकांनी मला धोका दिला. यामुळे आजही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वांचे आभार मानले. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाची आज (29 जून) बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे हे भावनिक झाल्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे राज्यात आठवडा भरापासून राजकीय संघर्ष सुरू आहे. यामुळे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या (30 जून) सकाळी 11 वाजात बोलविले आहे. यात महाविकास आघाडी सरकारला विश्वासदर्शक ठराव होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “ज्या मंत्र्यांच्या खात्याचे विषय बाकी राहिले आहेत. त्यासंबंधी आपण पुढच्या मंत्रिमंडळा बैठकीत निर्णय घेऊ. तुम्हील सर्वांनी मला जे सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद, माझ्याच लोकांनी मला धोका दिला. त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण जाली आहे. गेल्या अडीच वर्षात तुम्ही जे सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. माझ्याकडून काही चुकले असेल किंवा कोणाला दुखावले असेल तर मला माफ करा.”

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर 

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. तर उस्मानाबाद शहराच्या ‘धाराशीव’ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीची आज (29 जून) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ शहरांचे बदलेले नाव
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव ?

News Desk

शिवस्मारक बांधण्याआधी खर्च वसुलीचे सरकारला कोडे

News Desk

हार्दिकच्या टिकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

News Desk