Site icon HW News Marathi

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे.  गेल्या काही महिन्यापूर्वी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चवाट्यावर आला आहे. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे त्यांनी बुधवारी (16 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अशोक चव्हाणांना ऑफर देताना म्हणाले, “ते ज्या पक्षात आहेत. त्यांचे काँग्रेस पक्षात भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक झाली. यात पक्षाचा कुठेही विचार झाला नाही. पक्षाबद्दल विचार करण्यासाठी काँग्रेसमध्ये कोणाकडे ही वेळ नाही. यामुळे मला असे वाटते की, अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केले आहे. अशोक चव्हाणांनी यासंदर्भात विचार करायला पाहिजे.”

 

 

Exit mobile version