Site icon HW News Marathi

“चुना लगाव आयोग… “, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

मुंबई। “चुना लगाव आयोग आहे. सत्येचे गुलाम आहेत”, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. नुकतेच शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आज (५ मार्च) खेड मधील सभेतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप, निवडणूक आयोगाचा (Election Commission of India) खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला निवडणूक आयोगाला सांगायचे आहे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना कोणाकडे आहे, हे पाहायला यावे. हा चुना लगाव आयोग आहे. सत्येचे गुलाम आहे. हे निवडणूक आयुक्त राहायच्या लाकीचे नाहीत. यांनी ज्या तत्वांच्या आधारे शिवसेना सांगितली. मुळात ते तत्वचे खोटी आहेत. शिवसेनेची स्थापना ही निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही तर माझ्या वडिलांनी केली.”
मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला… 
“मी अडीच वर्ष घराबाहेर पडलो नाही. कारण घराबाहेर करोना होता. पण, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला. ते देशभर फिरून, गुवाहाटीला जाऊन देखील सांभाळता आले नाही. तुमचा अर्धा वेळ फिरण्यामध्येच जातोय. एकतर दिल्लीला मुजरे मारायला जाणे यात आयुष्य चालले. बाकीच्या काही जणांना अजून खोके मिळाले नाहीत, त्यांना सांभाळण्यात तुमचे उरलेले आयुष्य जाते”, अशी टीका मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर केली.
Exit mobile version