Site icon HW News Marathi

“निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे”, उद्धव ठाकरेंनी केली मागणी

मुंबई | “निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे”,  अशी मागणी करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी आज (20 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) आग पाखड केली आहे. यावेळी निवडणूक आयोग बरखास्त केले पाहिजे, असे धक्कादायक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे.  यामुळे राजकीय वर्तुळात काय पडसाद पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगासंदर्भात बोलताना म्हणाले, “जो काही निवडणूक आयोगाने सांगितले की, आमची जी कार्यकारणीची सभा झाली होती. त्याचा तपशील दिलेला नाही. आम्ही त्यांना सीडी सुद्धा दिली होती. आता त्यात निवडणूक आयोगाचे म्हणणे की, कव्हरींग पत्रात ते लिहिलेले नाही. मग कपिल सिब्बल यांनी सांगितले की, तुमच्याकडे जे काही विषय येतात, त्याचे गांभीऱ्य तुम्हाला कळत नाही का?, तुम्ही फक्त व्हिरिक पत्र वाचून तुम्ही निकाल देता. त्या पाकीटात काय आहे हे बघता की नाही. पाकिटात आम्ही दिलेले आहे की, अरविंद सावंत यांनी ती व्हायरल देखील केली. हा संपूर्ण विषय बघितल्यानंतर आताच निवडणूक आयोग बरखास्त झाला केला पाहिजे. आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे. ही माझ्या शिवसेनेची मागणी आहे.”

आम्हाला ऐवढी मेहनत करायला लावली

“मी तर माझ्या पदाधिकाऱ्यांना घरी बोलवून सांगितले होते की, कागदाची लढाई आहे. कागदाची लढाई आपल्याला कागदाने लढावी लागणार आहे. तुम्हाला पदाधिकाऱ्यांना शपथ पत्र द्यावी लागतील. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपण शपथ पत्र दाखल केली. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या फॉर्मटमध्ये आम्ही ती शपथ पत्र दाखल केली. गठ्ठेच्या गठ्ठे तेव्हा पाऊस पडत होता. त्या पाऊसामध्ये सुद्धा ट्रेनने आम्हाला तिकडे पाठवावे लागले. ते गठ्ठे आम्ही तिकडे नेहून दिले. आमच्या घरी रद्दी वाढली आणि रद्दीला काही भाव मिळत नाही. म्हणून निवडणूक आयोगाकडे नेहून त्या. म्हणून दिलेले नाहीत, तर निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले, तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र आणि सदस्य संख्या ही दाखवावी लागेल. त्यानुसार, आम्ही ती दाखवितो. ऐवढा सर्व लाखोने आम्ही उपद्याव केल्यानंतर अचानक निवडणूक आयोग असे म्हणायला लागला. ते काही चालणार नाही, ते जे निवडून आलेले होते. त्यांच्या संख्येनुसार पक्ष कोणाचा आहे ते ठरविले जाईल. ठिक आहे, हरकत नाही. पण ते पात्र आहेत का? अपात्र याचा फैसला आधी झाला पाहिजे. जर तुम्हाला हाच निकष लावायचा होता. तर आम्हाला ऐवढी मेहनत करायला लावली. का माझ्या शिवसैनिकांना पदरमोड करायला लावली. तुम्ही का? 100 रुपयाच्या स्टॅप पेपरवर तुम्ही आमची प्रतिज्ञा पत्र घेतली.”

 

 

 

 

 

 

Exit mobile version