Site icon HW News Marathi

येत्या 10 दिवसात गुलाम नबी आझाद नवी पक्षाची घोषणा करणार

मुंबई | येत्या दहा दिवसांत नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचे काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला येते एका सभेत केली. काही दिवसांपूर्वी गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला.

यावेळी गुलाब नबी आझाद म्हणाले की, “देशात 800 वर्षे मुघलांनी राज्ये केले आणि ब्रिटिशांनी 300 वर्षे राज्य केले. परंतु, जम्मू-काश्मीरमध्ये हजारो राज्यकर्ते आणि आक्रमण झाले. जम्मू-काश्मीरला सर्वांनी लुटले तर स्वातंत्र्यानंतर अंतर्गत राजकारण्याचे बळी ठरले,” असे ते म्हणाले.

गुलाब नवी आझाद यांनी शुक्रवारी किश्तवाडमधील रॅलीदरम्यान त्यांनी नवी पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. आणि जम्मू-काश्मीरमधील भागात जाऊन लोकांचे मत जाणून घेणार आहेत. आणि लोकांच्या समस्या ऐकणार आहे, असे त्यांनी सयावेळी सांगितले. गुलाब नवी आझाद म्हणाले, “जम्मू-काश्मीरमधील पूर्ण राज्याला दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांना नोकरी आणि जमिनीच्या अधिकारांचे संरक्षण करणे हा नवीन पक्षाचा अजेंडा असणार आहे, असे ते म्हणाले.

 

 

 

Exit mobile version