HW News Marathi
राजकारण

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

नवी दिल्ली | माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात निधन झाले. फर्नांडिस 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज (२९ जानेवारी) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते.

फर्नांडिस यांचा जन्म कर्नाटक येथे झाला होता. फर्नांडिस यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्याचबरोबर व्ही. पी. सिंग यांच्या काळात देखील त्यांनी रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. १९६७ ते २००४ दरम्यान त्यांनी ९ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. तसेच फर्नांडिस हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.

जॉर्ज फर्नांडिस यांचा अल्पपरिचय

जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी कर्नाटकात झाला होता. १९५० ते ६० या दशकात कामगार नेते म्हणून ते प्रसिद्ध होते, त्यांना बंदसम्राट म्हणून ओळखले जात होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. दिवंगत अटल बिहारी वाजयेयी यांच्या सरकारच्या काळात १९९८-२००४ या दरम्यान संरक्षणमंत्री म्हणून कार्यभार सांभाळाला होता. तसेच १९६७ ते २००४ या कालावधीत फर्नांडिस ९ वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडणू गेले होते. १९७४ रोजी रेल्वे, दूरसंचार, उद्योग खात्यांच्या मंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली. तसेच १९९४ रोजी फर्नांडिस यांनी जनता दल (सेक्युलर) सोडून समता पार्टीची स्थापना केली होती. २००९ ते २०१० या काळात राज्यसभेवर खासदार नियुक्ती करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे !

News Desk

मनसेकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देऊन सेना-भाजपला प्रेमाचा चिमटा

News Desk