Site icon HW News Marathi

“वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेली?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

मुंबई | “वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेली?”, असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारला केला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आज (13 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने 90 टक्के काम झाले केले असून हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार असल्याचे जाहीर देखील केले होते. परंतु, राज्यातील सरकार बदलल्यानंतर ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर का गेली?, पावणे दोन लाख कोटीचा हा उद्योग आहे. या प्रकल्पातून राज्यात 1 लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या. यामुळे राज्यातील हे सरकार गुंतवणुकीसाठी पोषक वाटत नाही.”

आमच्याशी गद्दारी केली तीही थोडी बाजूला ठेवून शासन आणि कामावर लक्ष केंद्रीत करावे. राज्याला थोडे आवरु शकेल, मी स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असे हे सरकार राजकारणात व्यस्त आहेत. राज्यातील शासनावर आणि कायदा सुव्यवस्थेवर कोणाचा अंकुश दिसत नाही.”

 

 

Exit mobile version