Site icon HW News Marathi

“हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यांविरोधात बोलून दाखवावे”, अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान

मुंबई | “हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यांविरोधात बोलून दाखवावे”, असे आव्हान माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना माध्यमांशी बोलताना केले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज (22 नोव्हेंबर) दापोली येथील साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) पाडण्यासाठी पोहोचले होते. यावेळी सोमय्यांच्या हातात प्रतिकात्मक हातोडा घेऊन ते साई रिसॉर्ट पाडण्यासाठी गेले होते. परंतु, प्रकरण वर्क ऑर्डर आभावी रिसॉर्टचे पाडकाम नाही, अशी माहिती परबांनी दिली आहे.

अनिल परब म्हणाले, “साई रिसॉर्ट माझ्या मालकीचे नसून हे रिसॉर्ट सदानंद परब यांचे आहे. तरी किरीट सोमय्या जाणुनबुजून मला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यांविरोधात त्यांनी बोलून दाखवावे,. असे आव्हान त्यांनी केले आहे. परब पुढे म्हणाले, “सोमय्या हे माझी बदनामी करत असून शिंदे गटाविरोधात बोलण्याची त्यांच्यात हिंमत सोमय्यांमध्ये नाही. नारायण राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन का गेले नाही. तसेच सुभाष देशमुखांचे घर सुधा अनधिकृत असून सोमय्या त्यांच्यावर हातोडा घेऊन जाणार का?, सोमय्यांची ही स्टंट नाही तर नौटंकी आहे.”

“यापूर्वी मी सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. परंतु, मी सोमय्यांवर फौजदारी दावा देखील केला आहे. मी क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करणार आहे. माझ्याकडे सोमय्यांनी केलेली बदनामी वक्तव्ये करायची. आणि माझा संबंध नसताना बातम्या द्यायचा, असे केले जात आहेत. यामुळे माझी प्रतिमा खराब होत आहे,” असे परबांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

 

 

Exit mobile version