Site icon HW News Marathi

“मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकरी भरतीच्या मुलाखती चेन्नईमध्ये का?,” आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई | मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकरी भरतीच्या मुलाखती चेन्नईमध्ये का होत आहेत, असा धक्कादायक माहिती माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्यावर शिंदे सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरेंनी आज (21 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, “वर्सोवा वांद्रे सी लिंक हा मोठा प्रकल्प सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही बैठका घेण्यात आल्या होत्या. वर्सोवा वांद्रे सी लिंक कंपनी बदलल्यानंतर दुसऱ्या कंपनीकडे काम देण्यात आले. या नवीन कंपनीने नोकरीसाठी जाहिरात काढली असून या मुलाखती चेन्नईमध्ये सुरू आहेत. आणि हा प्रकल्प आपल्या राज्यात होणार आहेत. मग आपल्या राज्यातील मुलांना नोकरीची संधी का दिली जात नाही. तर दुसऱ्या राज्यात का मुलाखती घेतल्या जात आहेत”, असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहे.

शिंदे सरकार काल परवापर्यंत भूमिपुत्रांच्या मुद्यावरून आरोप करत होते. परंतु, आता नोकरीसाठी महाराष्ट्रात कुठेही जाहिराती नाहीत. यामुळे एमएसआरडीसीच्या खात्यामध्ये गंभीर प्रकार घडत आहे. आणि मुख्यमंत्री नेमके काय करताय?, यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात की, या सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार होत आहेत. किंवा मुख्यमंत्र्याकडे लक्ष नाही”, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

 

 

 

 

Exit mobile version