HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का,  माजी पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेत करणार प्रवेश ?

सोलापूर | विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेवपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेसमधील आमदारांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण माजी पाणीपुरवठामंत्री आणि बार्शी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोपल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेल्या मुलाखत आणि बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली आहे.

सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना सोपल यांनी निर्धार मेळावा घेत आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजावून घेणार असून आठ दिवसात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यामुळे सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे समजले जाते.

सोपल यांच्या पाठोपाठ इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित या देखील शिवसेनेत प्रवेश करण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गावित यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी निमंत्रण दिल्याचे समजते आहे. गावित यांच्याकडून सध्या कुठलाही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात आणीबाणी सदृश्य स्थिती !

News Desk

“वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेली?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Aprna

लोकसभा निवडणुकीत कोण देणार उदयनराजेंना टक्कर ?

News Desk