HW News Marathi
राजकारण

बांगलादेशमध्ये हसीना यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली | बांगलादेशमध्ये निवडणूक आयोगाने रविवारी (३० डिसेंबर) रात्री उशीरा अधिकृतपणे शेख हसीना विजयी झाल्याची घोषणा केली. पक्षाच्या विजयाने हसीना यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हसीना यांच्या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकांत दणदणीत विजय मिळवला असून हसीना यांना २ लाख २९ हजार ५३९ मते मिळाली. तर विरोधी पीएनपी उमेदवाराला केवळ १२३ मतेच मिळाली.

तर विरोधकांनी निवडणुकांत घोटाळा झाल्याचा आरोप केला. विविध ठिकाणी सत्ताधारी अवामी लीग व प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात १७ जणांचा मृत्यू झाला. बांगलादेशमधील विरोधी पक्षांच्या आघाडीने (नॅशनल युनिटी फ्रंट) रविवारी निवडणूक निकाल नाकारले. यामध्ये माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनालिस्‍ट पार्टी (बीएनपी)’चाही समावेश आहे. गोनो फोरम, जातीय समाजवादी दल (जेएसडी), नागोरिक ओईकिया आणि कॅषिक श्रमिक जनता लीग या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विरोधी आघाडी उघडली होती.

काही जागांवर अवामी लीगच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मताधिक्य घेतले आहे. यावर खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार घडल्याचा आरोप करत विरोधी आघाडीच्या चाळीसहून अधिक उमेदवारांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. दरम्यान, संसदेच्या ३०० पैकी २९९ जागांसाठी आज मतदान पार पडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना पुन्हा दिली उमेदवारी

News Desk

फडणवीसांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा

News Desk

जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होणार !

News Desk