HW News Marathi
राजकारण

रायगडमधून तटकरे तर कोल्हापुरातून महाडिक लोकसभेच्या रिंगणात

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाली आहे. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. तर कोल्हापुरमधून धनंजय महाडिक मैदानात असतील. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (४ जानेवारी) झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. रायगड आणि कोल्हापूर या दोन जागांवरील उमेदवार राष्ट्रवादीने निश्चित केले आहेत. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरेंचे नाव निश्चित झाले आहे. शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक घेतली. त्यात पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यात आल्याचे समजते. शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचे केवळ चार उमेदवार निवडून आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांबाबत मवाळ तर विरोधकांबाबत कठोर भूमिका घेते !

News Desk

“…ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही”; राऊतांच्या सुटकेवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया

Darrell Miranda

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

News Desk