HW News Marathi
राजकारण

सत्याचा कोंबडा आरवलाय ‘मौनीबाबा’ने दिलेला सल्ला गांभीर्याने घ्या !

मुंबई | “गणेशाच्या आगमनाने विघ्ने दूर होतील अशी आशा होती, पण देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर टाकणाऱ्या बातम्या येत आहेत. त्यात मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य केले व भविष्यातील कठीण काळाची जाणीव करून दिली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. सामनात पुढे असे देखील म्हणाले की, नोटाबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरले. ३५ वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्यांचा संबंध आहे”, असे म्हणत मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.

३७० कलम हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकले व देश त्याबद्दल आनंदी आहे. मात्र कश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन भिन्न विषय आहेत. कश्मीरात विद्रोही रस्त्यांवर उतरले तर त्यांना बंदुकांच्या जोरावर मागे रेटता येईल, पण आर्थिक मंदीवर बंदुका कशा रोखणार? मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक ‘भूक भूक’ करीत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळय़ा घालणार काय? आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे. सामनाचे अग्रलेखामधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांचा सल्ला गांभीर्याने घ्या, असे सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदीवर दिला आहे.

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन इतकी बनवायचे मोदी यांचे स्वप्न आहे, पण चीनची अर्थव्यवस्था १३ ट्रिलियन इतकी आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था १५ ट्रिलियनच्या पुढे आहे व त्या तुलनेत हिंदुस्थानची अर्थव्यवस्था २.५ ट्रिलियनवर अडकली. त्यात आता मंदीचा मार बसत आहे. नोटाबंदी फसली व जीएसटीने व्यापारी व उद्योजकांच्या गळय़ाभोवती फास आवळला. त्यामुळे या क्षेत्रात अफरातफरी माजली आहे. आता ऑगस्ट महिन्यात जीएसटीचे कलेक्शन एक लाख कोटींपेक्षा कमी झाले आहे. हे कसले लक्षण समजायचे”, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून सुनावणी संपताच साध्वी प्रज्ञा यांनी भर न्यायालयात केला थयथयाट

News Desk

एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी; तर अजय चौधरी नवे गटनेते

Aprna

एक्झिट पोलचा परिणाम, शेअर बाजारात तेजी

News Desk