Site icon HW News Marathi

केंद्र सरकारची मोठी घोषणा; LPG सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी

मुंबई | प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस (LPG Gas) सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली असून हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी गॅस सिलिंडरवर देण्यात आली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवीन जारी केलेल्या अधिसूचनेनुसार म्हणाले, “उज्ज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळणार असून केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात 12 सिलिंडर देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक सिलिंडर मागे 200 रुपयाचे अनुदान मिळणा आहे. यानुसार लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे 9. 59 कोटी लाभार्थी 1 मार्च 2023 आहे, अशी माहिती ही केंद्र सरकारने दिली आहे.

सर्व प्रमुख भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक कारणांमुळे एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याचे सरकारने त्यांच्या निवेदनात सांगितले आहे.

 

 

 

Exit mobile version