HW News Marathi
राजकारण

‘थापा’ मारुन राज्य करण्याचे ‘स्किल’ सरकारने कमावले | उद्धव ठाकरे

मुंबई | “नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारखे लोक देशाची लूट करुन पळून जातात व भूमिपुत्र मात्र रोजगारासाठी रस्त्यावर संघर्ष करतायत . ‘स्किल’ कमावलेली रेल्वेची पोरं बेकार बसली असली तरी ‘थापा’ मारून राज्य करण्याचे ‘स्किल’ सरकारने कमावले आहे.” अशा शब्दात सामनाच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

पुर्वी रेल्वे अॅप्रेंटिस यांचा थेट रेल्वेत सामावेश करुन घेत होते. पण, त्यांच्यासाठी २० टक्के कोटा निश्चित केला आहे. शिवाय त्यांना लेखी परीक्षा सुद्धा द्यावी लागते. त्यामुळे या अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांना कमी संधी मिळतात. त्यांच्या विरोधात अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी ‘रेल रोको’ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दादर-माटुंगा रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ आंदोलन केले होते. तब्बल तीन तासानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घतले.

या आंदोलनाच्या वेळी सीएसटीच्या दिशने जाणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत. तसे लेखी आश्वासन मिळत नाहीत तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive :”…शिवसैनिकांना वाचवण्यासाठी बोलते, तेव्हा मी खूप मोठी नेता,” दीपाली सय्यद यांचा राऊतांना टोला

Aprna

विधानसभेपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरेंची भेट घेणार !

News Desk

महिला सबलीकरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार पवारांनी गमावला !

News Desk