HW News Marathi
राजकारण

मोदींचे सरकार संविधानाचा गौरव करणारे सरकार

सातारा | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारतीय संविधान आणि संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत आदर बाळगणारे आणि संविधानाच्या गौरवासाठी संसदेचे दोन दिवसीय स्वतंत्र अधिवेशन घेणारे आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सरकार आहे. त्यामुळे मोदी सरकार कडून संविधानाला कोणताच धोका नसून केवळ राजकारणासाठी विरोधक संविधानाला धोका असल्याचा खोटा खोडसाळ आरोप करीत आहेत असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माडले.

सुप्रसिध्द ज्ञान विकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमाले मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार ला पर्याय नाही या विषयावर रामदास आठवले यांचे व्याख्यान येथील समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आले होते. त्यात रामदास आठवलेंनी ५० मिनिटांच्या भाषणात केंद्रसरकार च्या मागील ४ वर्षांच्या कामगिरीची माहिती दिली. रामदास आठवलेंच्या वक्तृत्वाशैलीला सातारकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी रिपाइं चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड आयोजक चाफेकर; हेमांगी जोशी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान आणि आरक्षणाच्या बाजूने आहे. त्याबाबतचा खुलासा स्वतः प्रधानमंत्र्यांनी अनेकदा केला आहे. मात्र विरोधक हे केवळ राजकारणासाठी दलितांची माथी भडकविण्यासाठी संविधान बदलण्याचा खोटा आरोप करीत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भीम ऍप सुरू करून आधारशी जोडला . इंदूमिल ची जमीन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हस्तांतरीत करण्यात आली. नविदिल्लीतील २६ अलीपुर रोड या निर्वाणभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात आले.

लंडन मध्ये ही भीमस्मारक उभारण्यात आले.अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. याचबरोबर जीएसटी प्रणाली देशात पहिल्यांदाच सुरू करण्यात आली. साडे सहा लाख कोटींची रस्त्याची कामे सध्या सुरू आहेत. महिलांना विनातारण कर्ज देण्याची योजना प्रधानमंत्री मोदींनी सुरू केली. काळा पैसे संपविण्यासाठी नोट बंदी राबविली. बोगस कंपन्या बंद केल्या . सर्वात महत्वाचे म्हणजे प्रधानमंत्री मोदींचे सरकार आले तेंव्हापासून एकही भ्रष्टाचाराची मोठी घटना घडली नाही त्यामुळे गोरगरीबांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी सरकार ला पार्याय नाही. या सरकार ने सबका साथ सबका का विकास चे धोरण चांगले यशस्वी राबविल्याचे यावेळी आठवले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबेडकर, शिंदेसह शिवाचार्य उमेदवारांची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का ?

News Desk

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Manasi Devkar

#Results2018 : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आम्हाला संशय !

News Desk