HW News Marathi
राजकारण

परेश रावल ऐवजी हसमुख पटेल यांना भाजपकडून उमेदवारी

अहमदाबाद | बहुचर्चित अशा अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदार संघातून भाजपने अभिनेते आणि विद्यमान खासदार परेश रावल यांच्या जागी हसमुख एस पटेल उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये परेश रावल विजय झाले होते. परंतु निवडणुकीपूर्वीच परेश रावल यांंनी चार ते पाच महिन्यांपूर्वीच निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते.

हसमुख पटेल हे गुजरातमधील हमराईवाडी येथील आमदार आहेत. पटेल विधानसभेच्या २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीत विजयी झाले होते. यानंतर पटेल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल पासून ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये भाजपने ‘भगव्या’चा मोह सोडून ‘हिरवा’ रंग केला आपलासा 

News Desk

राफेल कराराच्या मुद्दयावरून राजकारण पेटले

swarit

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू; नाशिकमध्ये कोण मारणार बाजी?

Aprna