HW Marathi
मनोरंजन राजकारण

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

नवी दिल्ली | हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने आज (७ जुलै) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. संपनाने दिल्लीतील भाजपच्या जवाहर लाल नेहरू स्टेडियमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान, भाजपचे महासचिव रामलाल आणि मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत सपना चौधरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

भाजपचे सध्या संपूर्ण देशात सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अंतर्गत अनेक नागरिकांना भाजपमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही सपना चौधरी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु स्वतः सपना चौधरीने राजकारणात येण्याचा विचार नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. यामुळे सपनाच्या आजच्या राजकीय प्रवेशाकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष आहे.

Related posts

रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

News Desk

सॅम पित्रोदा यांना गांधी परिवाराची सर्व गुपिते माहित आहेत !

News Desk

चित्रा वाघ यांनी दबावापोटी भाजपत जाण्याची परवानगी मागितली !

News Desk