Site icon HW News Marathi

“सत्ताधारी आमदारांना सत्तेची मस्ती आली का?”, अजित पवारांचा सवाल

मुंबई | हिंगोली येथील कामगार विभागाच्या मध्यान भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केला भांडाफोड बांधकाम कामगारांना निकृष्ट दर्जाचे जेवन दिल्याने व्यवस्थापकाच्य कानशिलात लगावली. संतोष बांगरांच्या कृतीचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. “तुम्हाला सत्तेची मस्ती आली का?”, असा परखड सवाल अजित पवार यांनी आज (16 ऑगस्ट) सत्ताधाऱ्यांना पत्रकार परिषदेतून केला आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलत असताना अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या वक्तव्यांवर ताशेरे ओढले. यावर अजित पवार म्हणाले, “सत्ताधारी पक्षातले काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा, अशी भाषा वापरत आहेत. हात पाय तोडण्याची भाषा केली जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून सुसंस्कृत राजकारणाचा पाठ आपल्याला घालून दिला होता. त्यांच्या महाराष्ट्रात तोडफोडीची भाषा आपल्याला शोभते का? शिंदे-फडणवीस यांना ही भाषा योग्य वाटते का? शिंदे गटाच्या एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्याच्या कानशिलात पेटवली. तुम्हाला सत्तेची मस्ती आली का? “असा परखड सवाल त्यांनी केला आहे.

नको ते विषय पुढे आणून त्यावर चर्चा केली जाते

“राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणून त्यावर चर्चा केली जात आहे. महाराष्ट्रात दोन व्यक्ती भेटल्यानंतर विविध प्रकारे अभिवादन केले जाते. मात्र आता वंदे मातरम् बोलण्यास सांगितले जात आहे. वंदे मातरमला विरोध असण्याचे काहीही कारण नाही. पण सरकारमध्ये नसताना ज्या मागण्या केल्या होत्या, त्या विसरुन जायचं, त्यावर काहीच बोलायचं नाही, राज्याच्या प्रश्नांवर बोलायचं नाही,” अशी पद्धत अवलंबली गेली असल्याची टीका अजित पवार सरकारवर केली.

 

संबंधित बातम्या

कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्ना दिल्याने संतोष बांगरांनी चक्क व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार! – अजित पवार

Exit mobile version