Site icon HW News Marathi

अशोक चव्हाणांनी ‘मविआ’च्या महामोर्चात अनुपस्थित; कारण…

मुंबई | महापुरुषांच्या अवमान करणाऱ्याविरोधात महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) महामोर्चा सुरू झाला आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील सहभागी होणार आहे. महाविकास आघाडीचा हा महामोर्चात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) गैरहजर असणार आहे. अशोक चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, अशोक चव्हण महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिले आहे. या ट्वीटमध्ये अशोक चव्हाण म्हणाले, “महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी.”

यापूर्वी अशोक चव्हण काँग्रेस पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. परंतु, महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत अशोच चव्हणांच्या हजेरीने भाजप प्रवेशाला चर्चेला पुरणविराम लागला आहे. पण, महामोर्चा गैरहजर राहिल्याने सर्वांच्या भुव्या उंचविल्या आहेत.

 

 

Exit mobile version