Site icon HW News Marathi

“…तर महाविकास आघाडी बहुमतात आहे”, अजित पवारांचे स्पष्ट मत

मुंबई | “ते शिवसेनेचे आमदार आहेत. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने समर्थन दिले आहे. मग पूर्ण बहुमत आहे ना,” असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज (24 जून) बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

12 आमदारांच्या निलंबन केले आहे अजित पवार म्हणाले, “जे काही विधीमंडळाच्या संदर्भातील असेल त्याबद्द्लचा निर्णय अध्यक्ष हे निर्णय घेतली. यामध्ये सरकारमधून तुम्हाला आम्हाला बोलण्याचा काढीचा अधिकार नाही. ते काय म्हणतात की आम्ही शिवसेनेचेच आहोत, असे गुवाहाटीला गेलेले लोक म्हणतात. “राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रसे आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे मिळून बहुमत आहेच. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. बैठकीत काही झाले नाही, काल जो निर्णय घेतला तीच पार्टीची भूमिका आहे,” बैठकीत काय निर्णय संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे त्यांनी हे उत्तर दिले.”

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत पुढील रणनितीवर चर्चा करणार

अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना मध्यंतरी कोरोना झाल्यामुळे भेटता आले नाही. परंतु, आज सायंकळा 6.30 वाजता शरद पवारसाहेब, जयंत पाटील आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातोय. सध्याच्या परिस्थितीवर पुढील काय रणनिती असेल यावर चर्चा करण्यासाठी गेले आहेत. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार हे शिंदेसोबत झाले आहेत, पत्रकारांच्या या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “अरे ते शिवसेनेचे आहेत ना, तुम्ही काय सांगितले की, ते शिवसेनेचे आमदार आहेत. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने समर्थन दिले आहे. मग पूर्ण बहुमत आहे ना.”

संबंधित बातम्या

“पुढचे अडीच वर्ष ‘मविआ’ सरकार पूर्ण करेल”, संजय राऊतांचा विश्वास

 

Exit mobile version