HW Marathi
देश / विदेश राजकारण

कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली | कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आज (१६ जुलै) सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. जेडीएस आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. यावेळी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारपर्यंत (१६ जुलै) निर्णय घेऊ नका, असा आदेश न्यायालयाने गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

एच. डी. कुमारस्वामी यांना १८ जुलैला बहुमत  सिद्ध करण्यास विधानसभेच्या सभापतींनी सांगितले आहे. राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. यापैकी दोन बंडखोर आमदारांचे मन वळविण्यात काँग्रेसला यश आले आहे. परंतु काही आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. तसेच, या बंडखोर आमदारांनी काँग्रेस नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे मुंबई पोलिसांना पत्र लिहून सांगितले आहे.

.

Related posts

मला शिक्षण खात्यात काम करायला आवडेल !

Gauri Tilekar

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची होणार नियुक्ती

rasika shinde

काहीच वेळात ‘फनी’ चक्रीवादळ २०० किमी प्रतितास वेगाने ओडिसा किनारपट्टीला धडकणार

News Desk