HW Marathi
देश / विदेश राजकारण

आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करावेत !

नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीमाना दिल्यामुळे कर्नाटकमध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ‘आम्ही दिलेल्या राजीनाम्याचा स्वीकार केला जात नाही. ही एकप्रकारे लोकशाहीच्या अधिकारांची पायमल्ली आहे’, असे म्हणत या आमदारांनी बुधवारी (१० जुलै) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज (११ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एच. डी.कुमारस्वामी हे आज (११ जुलै) मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. दरम्यान, या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार ? काय निर्णय घेतला जाणार ? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk

आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आंदोलकांनी अहिंसा आणि शांततेचा मार्ग अवलंबावा

News Desk

अनिकेत तटकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

धनंजय दळवी