HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर मागवली अन् मंत्र्यांसाठी वापरली !

मुंबई | “पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टर मागवली. मात्र, ती हेलिकॉप्टर्स मदतकार्यासाठी नव्हे तर मंत्र्यांसाठीच वापरण्यात आली”, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. “२००५ साली निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या वेळी काँग्रेसने ज्या पद्धतीने जनतेला वागणूक दिली तसेच या सरकारचे वर्तन आहे”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले आहे. सोमवारी (१२ ऑगस्ट) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

“अद्यापही सरकारकडून राज्यातील पूरग्रस्तांपर्यंत आवश्यक त्या प्रमाणात औषधांचा पुरवठा झालेला नाही. पुरग्रस्तांकरिता मदतकार्य राबविण्यासाठी प्रशासनाकडून मागविण्यात आलेल्या हेलिकॉप्टर्सचा वापर हा मंत्र्यांसाठीच झाला. धरणांच्या जलाशयांची पाण्याची पातळी ओलांडल्यानंतर धरणांची दार उघडण्यात आली नाहीत. त्यानंतर सर्व धरणांतून एकाच वेळेस पाणी सोडण्यात आले ज्यामुळे या भागांत पूरस्थिती निर्माण झाली”,असे प्रकार आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला बसला आहे. या तिन्ही जिल्ह्यात निर्माण झालेली गंभीर पूरस्थिती आणि त्यामुळे इथल्या लोकांचे झालेले हाल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आता इतक्या दिवसानंतर अखेर पूरग्रस्त भागांतले पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. मात्र, पुराचे पाणी ओसरल्यानंतर साथीच्या रोगांचे मोठे संकट या भागात निर्माण होईल. त्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच प्रयत्न सुरु होणे महत्त्वाचे आहे.

Related posts

नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली सभा ?

News Desk

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर

News Desk

मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर, सुशीलकुमार यांचा खळबळजनक खुलासा

News Desk