June 26, 2019
HW Marathi
देश / विदेश राजकारण

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिदक्षतेचा इशारा

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या १६ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या १८ नवनिर्वाचित खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरेंचा हा दुसरा अयोध्या दौरा असणार आहे. दरम्यान, याचवेळी म्हणजेच १८ जून रोजी २००५ साली अयोध्येत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत अतिदक्षतेचा इशारा लागू करण्यात आला आहे. अयोध्येत ५ जून २००५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. अलाहाबाद न्यायालय या प्रकरणातील आरोपींना १८ जून रोजी शिक्षा सुनावणार आहे. दरम्यान, याच दरम्यान अयोध्यात ३ व्हीआयपी कार्यक्रम आयोजित असून त्यामुळे अयोध्येत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अयोध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे, २४ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांचा तो अयोध्या दौरा २४ तासांच्या आतच संपला होता. “आज पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे. मात्र, आता वारंवार येत राहीन”, असेही उद्धव ठाकरे आपल्या पहिल्या अयोध्या दौऱ्यात म्हणाले होते. आता, १६ तारखेला उद्धव ठाकरे आपल्या विजयी खासदारांसह पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

 

Related posts

महाराष्ट्राबाहेर सभा घेणार नाही !

News Desk

पाकिस्तानी लढाऊ विमान भारतीय हद्दीत, हवाई हद्दीचे उल्लंघन

News Desk

उद्धव ठाकरेंचे आजच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

News Desk