HW News Marathi
राजकारण

धनंजयराव राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती पैसे घेतले…

बीड(वृत्तसंस्था): पाच जिल्हा परिषद सदस्यांच्या बदल्यात सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पंधार कोटी रुपये घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ज्या चुलत्याने ( दिवंगत गोपीनाथ मुंडे) राजकारणात आणलं, अनेक पदे दिली, आमदारकी दिली, सत्ता असती तर मंत्रीही केलं असतं, त्यांच्याशी गद्दारी करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी धनंजयराव तुम्ही राष्ट्रवादीवाल्यांकडून किती कोटी रुपये घेतले होते,स असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी १५ कोटी रुपये घेतल्याचे केलेले वक्तव्य ऐकून मला काहीच आश्चर्य वाटले नाही. यापूर्वीही धनंजय यांनी असे बालिश आणि हास्यास्पद आरोप माझ्यावरच नव्हे तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर केले आहेत. त्यामुळे कालचे वक्तव्य त्या बालिशपणातूनच आले आहे. धनंजय मुंडे यांनी मुंडेसाहेबांच्या जन्मतारखेबाबत अशीच चुकीची माहिती अजित पवारांना दिली होती. शरद पवारांच्या जाहीर सभेतही मुंडे साहेबांना मीच एक लाख बोगस मतदान करून विजयी केल्याचे सांगितले होते. बोगस मतदान करणे व करवून घेणे हा गुन्हा असतो हे माहित नसण्या इतपत धनजंय अपरिपक्व आहेत हे सिद्ध केले आहे. धनजंय मुडेंना भाजपमध्ये सर्व काही दिले होते तरीही ते राष्ट्रवादीत गेले. मग धसांना पैसे देऊन खरेदी केले म्हणणाºया धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत जाताना किती कोटी रुपये घेतले होते असे मला त्यांना विचारायचे आहे, असे पंकजा म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्याच्या घरातून १७ देशीबॉम्ब तर ११६ जिवंत काडतुसे जप्त

News Desk

भाजपला चढलेली सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी | सुप्रिया सुळे

Gauri Tilekar

अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं !

News Desk