Site icon HW News Marathi

“मी महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट घेतलेय” उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

मुंबई | “मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना. महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट मी घेतलेले आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट मी घेतले आहे,” असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी काल (24 ऑगस्ट) षण्मुखानंद सभागृहात मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमदरम्यान मुख्यमंत्र्यांना कंत्राटी मुख्यमत्री म्हणून उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज (25 ऑगस्ट) पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या कंत्राटी मुख्यमंत्री या शब्दाचा खरपूस समाचार घेतला

मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले, “आज माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून झाले आहे. कंत्राटी मुख्यमंत्री यामध्ये राज्याचा कोणीही मुख्यमंत्री असतो. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा राणेसाहेबांनी भाषणामध्ये कुठे तरी उल्लेख केला होता. तुम्ही राणेंना जेलमध्ये ठाकले. म्हणजे केंद्रीय मंत्री, जेव्हायला बसलेला माणूस त्याला जेऊ पण नाही दिले. जेसे ब्रिटिश, सरळ जेलमध्ये टाकून दिले. काय तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरला. आणि आता मुख्यमंत्र्यांला हा कंत्राटी मुख्यमंत्री. या देशाच्या लोकशाहीमध्ये घटना, नियम आणि कायद्याप्रमाणे आम्ही येथे बसलोय. बहुमत सिद्ध करून आम्ही बसलोय. उगाच बसलो नाही. नाही तर आमचा स्पोर्ट काढून टाका. पण आम्ही नियमाच्या विरोधात  मी कालही बोललोय, बलकूल कुठले कायदा आणि घटनेच्या विरोधात कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही. अध्यक्ष बसलेत, त्यांना कायद्याबद्दल सर्व माहिती आहे. त्यामुळे मी एकच सांगेन, जी वैचारीक पातळी जी आहे. ती खालावलेली आहे. होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना. महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट मी घेतलेले आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट मी घेतले आहे. मी सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे आणि त्यांचे आश्रू पसण्याचे कंत्राट घेतले आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे दु:ख दूर करण्याचे कंत्राट घेतले आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे कंत्राट मी घेतले आहे. बहुजनांच्या विकासाचे कंत्राट मी घेतले आहे.”

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले, “राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचा प्रश्न गंभीर झाला आहे. कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे कंत्राटी आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही,” असा टोला त्यांनी लगावला होता.

 

Exit mobile version