Site icon HW News Marathi

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला (Intellenge Bureau)  मिळाली आहे. “मी शेवटी जनतेमधील माणूस आहे. आणि मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. या धमक्यांचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही आणि होणार नाही”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी जीवे मारण्याची धमकी आल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “माझ्यावर धमक्यांचा ऐवढा परिणाम होत नाही. आणि मी त्याकडे लक्षही देत नाही. यामध्ये पोलीस आपले काम करत आहेत. पोलिसांनी सुरक्षेतेची काळजी घेतली आहे. यापूर्वी  नक्षलवादी असो किंवा देशविघातक शक्तींनी जीवे मारण्याची धमकी मी मुख्यमंत्री नव्हतो. तेव्हा देखील  दिल्या आहेत.  मी मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हा देखील मला अशा धमक्या आल्या होत्या. यामुळे धमकी येणे हे माझ्यासाठी काही नवीन नाही. मी शेवटी जनतेमधील माणूस आहे. आणि मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. या धमक्यांचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही आणि होणार नाही. फक्त ऐवढेच आहे की पोलीस आणि गृहविभाग यांची योग्य ती काळजी घेतोय. यासंदर्भातील सूचना त्यांनी पोलिसांना दिलेल्या आहेत.”

दरम्यान, महिन्याभरापूर्वीच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचे पत्र आले होते. यानंतर निनावी धमकीचा एक फोन सुद्धा आला होता. यापूर्वीच नकक्षलवाद्यांचे जीवे मारण्याची धमकी आली होती. मुख्यमंत्री पंढरपुरातील आषाढी वारीच्या वेळीही जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाची माहिती

 

Exit mobile version