HW News Marathi
राजकारण

मी शिवसैनिकांना रक्त न सांडण्याचे आवाहन करतोय! – उद्धव ठाकरे

मुंबई | “मी शिवसैनिकांना रक्त न सांडण्याचे आवाहन करतोय. परंतु, असे होत राहिले तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या वाहनावर  काल (14 जुलै) रात्री हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज (15 जुलै) भायखळाला जावून  208 नंबरच्या शाखेला भेट दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी शिवसैनिकांना रक्त न सांडण्याचे आवाहन करतोय. पण, हे असे होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतले जाणार नाही,” असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे पोलिसांना विचारले की, “शिवसैनिकांवर हल्ला करणाऱ्या संशयिताना संरक्षण का दिले जात आहे? आणि तुम्ही किती काळ शोध सुरू राहणार आहे?, सवाल ही त्यांनी पोलिसांना केला.

“यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही यावर तात्काळ कारवाई करा. तुम्ही चौकशीसाठी का नाही बोलविले?, याआधी असे राजकारण कधीच झाले नाही. तुम्ही राजकारणात पडू नये. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये,  तुम्ही हातवर करा शिवसैनिक त्यांचे काम करेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोमनाथ चटर्जींच्या निधनाने संसदीय राजकारणातील तपस्वी नेता हरपला

News Desk

मोदींसारखे खोटे बोलण्यास शिकविण्यासाठी काँग्रेसने सुरू केला कोर्स

News Desk

“मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna