Site icon HW News Marathi

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. “मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया राहुल गांधींनी ट्वीट करत दिली आहे.मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने आज (24 मार्च) दुपारी  खासदारकी रद्द करण्याचा आदेश जारी केले आहेत. याविरोधात देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

 

राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हणाले, “मैं भारत की आवाज के लिए लड रहा हूं! मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।” मानहानी प्रकरणी सूरत जिल्हा व सत्र न्यायालयाने राहुल गांधींना गुरुवारी (23 मार्च) दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. परंतु, काही वेळाने सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाने आज  राहुल गांधीवर कारवाई करत खासदारकी रद्द केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण

काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी कर्नाटकात प्रचारासाठी गेले असताना ‘मोदी’ आडनावावरून टीका केली होती. “सर्वच चोरांचे नावे ही मोदी का असतात. यात नीरव मोदी, ललित मोदी अशी नावे घेतली,” असे विधान राहुल गांधी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधीच्या विधानाचा आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी त्यांच्याविरोधात  सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

Exit mobile version