Site icon HW News Marathi

“मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | “मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांना लगावला आहे. राज ठाकरेंनी आज (11 ऑक्टोबर) मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीत स्वबळाने लढण्याची तयारी करा, असे आवाहन मनसैनिकांना केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, “आपण लवकरच सत्तेच्या खुर्चीवर बसू आणि आपल्यापैकी एक जण सत्तेच्या खुर्चीवर असणार आहे. मी स्वत: त्या सत्तेच्या खुर्चीवर बसणार नाही. तसेच राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानुसार, मनसैनिकांनी तयारीला लागा”, असा आदेश त्यांनी दिला आहे.

निवडणूक स्वबळावर लढवणार

“माध्यमांद्वारे जी विधाने आणि बातम्या आल्यात. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणूक लढवणार असून लोक आता शिंदे-ठाकरे यांच्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत. राज्यात सध्या घाणेरड्या राजकारणाला लोकांना पर्याय म्हणून आपला विचार करतील. यामुळे मनसैनिकांनी सकारात्मक विचार ठेवा आणि लोकांपर्यंत पोहोचा”, असा कानमंत्री राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला आहे.

 

 

Exit mobile version