HW News Marathi
राजकारण

मी जिथे आहे तिथे खूश आहे !

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे नेतृत्त्व करतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. सोशल मीडियावर देखील “राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी”, असे मेसेजस फिरत होते. मात्र आता “मी जिथे आहे तिथे खूश आहे,” असे म्हणत नितीन गडकरी यांनी स्वतः च भाजपचे नेतृत्त्व करण्याबाबतच्या या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी “२०१९ मध्ये भाजपचे नेतृत्त्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा,” अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी संघाच्या सरसंघचालकाकडे केली होती.

किशोर तिवारी यांच्या या मागणीबाबत बोलताना गडकरी म्हणाले कि, “या मागणीला कोणत्याही प्रकारचा आधार नसून सध्या मी जिथे आहे तिथे खूश आहे”. “सध्या माझे प्राधान्य हे चारधाम आणि इतर स्थळांसाठी उत्तम रस्ते बनविण्याला आहे. तसेच मला सर्वात आधी गंगा नदीच्या शुद्धीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. ही कामे करण्यात मला आनंद मिळतो. शक्य तितक्या लवकर मला ही पूर्ण करायची आहेत”, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. इतकेच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विजय मिळवतील असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही !

News Desk

उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

News Desk

फडणवीस सरकारकडे क्रीडा क्षेत्रासाठी चांगली बातमी

Gauri Tilekar