HW News Marathi
राजकारण

मी चौकीदार नाही तर जन्मत:च शिवसैनिक !

मुंबई | मला चौकीदार होण्याची आवश्यकता नाही. मी जन्मत:च शिवसैनिक असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (१ एप्रिल) प्रथमच भाजपच्या ‘मैं भी चौकीदार’ या प्रचारमोहिमेबाबत आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून “मैं भी चौकीदार” ही प्रचारमोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या स्वतःच्या नावाआधी ‘चौकीदार’ असा शब्द लावला आहे. दरम्यान, यात भाजपच्या मित्र पक्षांचा मात्र समावेश नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ मार्चला आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर, भाजपच्या बहुतेक सर्वच नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ लावले. मित्र पक्षांनी मात्र भाजपच्या या प्रचार मोहिमेपासून लांब राहणे पसंत केले आहे. “मला चौकीदार होण्याची गरज नाही. मी जन्मत:च शिवसैनिक आहे. मी कायम शिवसैनिकच राहणार. मी काँग्रेसमुक्त अभियानासाठी काम करत नाही. मात्र, आम्ही पंतप्रधान मोदींना आणखी पाच वर्षे देण्याचे ठरविले आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

“देशाचा चौकीदार खंभीरपणे उभा आहे, देशाची सेवा करतो आहे. परंतु, मी एकटा नाही. भ्रष्टाचाराविरोधात, समाजातील गुन्हेगारीविरोधात जो उभा आहे तो प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. भारताच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. आज प्रत्येक भारतीय बोलत आहे “मैं भी चौकीदार”, असे म्हणत मोदींनी या मोहिमेला सुरुवात केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमध्ये नवे पर्व

News Desk

पार्थ प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

swarit

चहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप

News Desk