Site icon HW News Marathi

“मला आता भविष्याच्या लढाईची चिंता नाही”, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “मला आता भविष्याच्या लढाईची चिंता नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे ( Andheri East Assembly bypoll) उमदेवार ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर म्हणाले. पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचा 66 हजार 247 मतांनी विजयी झाला आहे. तर दुसऱ्या नंबरवर नोटाला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहे. नोटाला 12 हजार 776 मते मिळाली आहे. ऋतुजा लटकेंना विजयी झाल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतान ही प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मधल्या कपड कारस्थानानंतर पहिली ही पोटनिवडणूक झाली. आमचे चिन्ह आणि नाव गोठवले गेले, मशाल ही निशाणी घेऊन आम्ही हे लढलो. मशाल भडकली, भगवा फडकला, मला याचा नक्की अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचे श्रेय शिवसैनिकांनाच आहे. पण, आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि त्यांच्यानंतर कम्युनिस्ट पक्ष, संभाजी भ्रिगेड अजून काही हितचिंतक आहेत. ज्यांनी मेहनत घेतली त्यासर्वांना मी धन्यवाद देतो. आणि हि आता सुरुवात झालेली आहे. लढाईची ही विजयाने झालेली आहे. त्यामुळे मला आता भविष्याच्या लढाईची चिंता नाही. या निवडणुकीत एकजुटीने हा विजय आपण घेचून घेतला. तसाच यापुढचा देखील विजय घेचून घेऊन आणू.

संबंधित बातम्या

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजयी; तर ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

 

Exit mobile version