HW News Marathi
राजकारण

मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

मुंबई | “मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. ज्यांना लोकांना सत्तेची लालसा आहे त्यांना ती भोगू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदासह उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या सदस्त्वाचा देखील त्याग केल्याची त्यांनी आज (29 जून) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहे. काही मिनिटापूर्वीच महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणी होणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बहुमत चाचणी स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.  करण्याची शिवसेनेची शिवसेनेने बहुमत चाचाणी स्थगित होण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

 

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले

“मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे. आपण सगळ्यांनी मला आजपर्यंत खूप प्रेम दिले आहे. मला आशीर्वाद दिले. मी घाबरणार नाही, कारण उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचे रक्त सांडेल. त्या पापाचे धनी मला व्हायचेय नाही. आणि मी ते होऊ देणार नाही. मी शिवसैनिकांनाही सांगेन की उद्या अजिबात त्यांच्या मध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवले. याचे त्यांना खाऊ द्या. ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लखलाभ. मला तुमच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा गोडवा पाहिजे. हा कुणी हिरावून नाही घेऊ शकत.”

माझ्याविरोधात माझा माणूस उभा राहणे माझ्यासाठी लज्जास्पद

उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्या विरोधात किती लोक आहे यात मला काही रस नाही. पण, माझ्याविरोधात माझा एक जरी माणूस उभा राहिला तर ते माझ्यासाठी लज्जास्पद असेल. मला बहुमताचा खेळच खेळाचा नाही. मला प्रामाणिक पणे असे वाटते की, ज्या शिवसेनेने राजकीय जन्म दिला. ज्यांनी शिवसेना प्रमुखांनी मोठे केले. त्याच शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे पुण्य यांच्या पदरात पडत असेल तर पडू द्या. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला हेच माझे पाप आहे. त्याची अशी फळे भोगावी लागतील त्यात त्यांचा काही दोष नाही.”

 

संबंधित बातम्या
‘मविआ’ सरकारला मोठा धक्का! उद्या बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी निवडणुकांसाठी अखिलेश यादव-मायावती एकत्र येणार ?

News Desk

सांगलीतील राष्ट्रवादी-काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग 

News Desk

कोल्हापुरच्या अंबाबाईच्या दर्शनाने युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, जागावाटपचा तिढा कायम

News Desk