HW News Marathi
राजकारण

मी पवारांकडे शिवसेना-भाजपला सल्ला देण्याची मागणी केली !

मुंबई | राज्यात भाजप-शिवसेनेत निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या तिढ्यावर अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. एकीकडे भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर असून बसलेले असताना दुसरीकडे अद्याप राष्ट्रवादीने आपली विरोधी पक्षातच बसण्याची भूमिका स्पष्ट करूनही शिवसेना-राष्ट्रवादी-काँगेस अशा समीकरणांची देखील चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपला कोकण दौरा रद्द करून कराडहून थेट मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर, आज (८ नोव्हेंबर) आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भाजप-शिवसेनेला सल्ला द्यावा, अशी मागणी रामदास आठवलेंनी पवारांकडे केली आहे.

काय म्हणाले रामदास आठवले ?

  • सध्याच्या राजकीय स्थितीवर सल्ला घेण्यासाठी पवारांकडे आलो होतो.
  • पवार ज्येष्ठ नेते. राज्यातील परिस्थिती गंभीर, म्हणून पवारांकडे चर्चा करण्यास आलो.
  • भाजप-शिवसेनेत अद्याप एकमत नाही.
  • शिवसेना-भाजपला सल्ला देण्याची मागणी पवारांकडे केली.
  • भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन केले पाहिजे अशी पवारांची इच्छा

काय म्हणाले शरद पवार ?

  • राज्यातील बिघडललेली स्थिती दुरुस्त व्हावी
  • भाजप-शिवसेनेला जनतेचा जनादेश
  • राज्यात स्थिरता येईल याची काळजी घ्यावी
  • राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल.
  • राज्यपालांनी बहुमत असणाऱ्या सरकारला बोलवायला हवं.
  • राज्यपाल भाजपला का बोलवत नाहीत कळत नाही.
  • शिवसेना-भाजपने समंजसपणा दाखवा
  • रामदास आठवलेंनी भाजप-शिवसेनेत मध्यस्थी करावी
  • आमच्याकडे आवश्यक आकडे असते तर थांबलो असतो का ?
  • आमच्याकडे आकडे नाहीत, आम्ही विरोधातच बसणार
  • राष्ट्रपती राजवट लागू शकते, फेरनिवडणूक लगेच नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे !

News Desk

#RafaleDeal : कॅगच्या अहवालाबाबत राहुल गांधींची पत्रकार परिषद

Gauri Tilekar

“मी सगळं मान्य करेन पण…”, जितेंद्र आव्हाडांची विनयभंगाच्या आरोपानंतर पहिली प्रतिक्रिया

Aprna