Site icon HW News Marathi

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले…

मुंबई | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by-election) भाजपने माघार घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “भाजपचे उमदेवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी केली नव्हती. मी त्यांना फक्त सुचविले होते.”

शरद पवार म्हणाले, “भाजपचे उमदेवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी केली नव्हती. मी त्यांना फक्त सुचविले होते.  मी फक्त भाजपला सल्ला दिला होता. मी सुचविल्यानंतर भाजप त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी आता होती. आणि भाजपने निर्णय घेतला याचा मला आनंद आहे. यामुळे यावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही. उशिरा का होईना निर्णय झाला हे महत्वाचे आहे.”

“भाजपने कोणाच्याही सांगण्यावर उमेदवार मागे घेतला असला तरी माझी हरकत नाही. माघार घेण्याचा निर्णयावर शंक उपस्थित करण्याची गरज नाही. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही फक्त दीड वर्षाची निवडणूक होती. दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर त्यांची ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता,” असे पवार म्हणाले.

 

 

 

Exit mobile version