HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा, मी देशासाठी शहीद झालो !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकाश गजभिये शहीद हेमंत करकरे यांच्या वेशभूषा परिधान करून सभागृहात दाखल झाले. गजभिये यांना पोलिसांच्या वेशात पाहून सर्वजण चक्रावून गेले. प्रज्ञासिंग ठाकूरच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी गजभिये हे करकरे यांच्या पोलिस वेशभूषेत ‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा मी देशासाठी शहीद झालो‘ अशा आशयाचे बॅनर हातात घेवून विधानभवनात आज (२६ जून) दाखल झाले.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप  प्रज्ञासिंग ठाकूरने  २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या “हेमंत करकरे यांनी मला खोट्या प्रकरणात फसविले. मी हेमंत करकरे यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि त्यांना दहशतवाद्यांनी मारले”, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. प्रज्ञासिंगच्या वक्तव्याने देशाचा शहीदांचा अपमान केला होता.

गजभिये हे नेहमी वेगवेगळे गणवेश परिधान करून आंदोलन करतात. यापूर्वी संत तुकाराम, सरकारला कंटाळलेला शेतकरी, संभाजी भिडे यांचे मुले होणारे आंबे विकून आणि आता शहीद हेमंत करकरे यांच्या वेशभूषेत परिधान करून  प्रज्ञासिंग ठाकूरचा निषेध केला. अशा अनोख्या वेशभूषा साकारुन सरकारचे लक्ष वेधले होते. शिवाय त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चाही झाली होती.

 

Related posts

अजित पवार यांनी खरंच राजकारणातून संन्यास घ्यावा !

News Desk

जाणून घ्या.. तुमच्या एका मताचे मूल्य

News Desk

सेना-भाजपने राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापरले

News Desk