HW News Marathi
राजकारण

“आईचे दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नकोय”, मुख्यमंत्र्यांचा राज्यसभेत दगा देणाऱ्यांना सूचक इशारा

मुंबई | “आईचे दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नकोय,” बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचे आठवण करून देते, शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यसभेत दगा देणाऱ्या आमदारांना सूचक इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी आज (19 जून) शिवसेनेच्या 56 वर्धापन दिना निमित्ताने पवई येथील हॉटेल वेस्ट इन पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद निवडणूक, भाजप, विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी मुद्यांवर भाष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “अशी एकदा मागे फाटा फुट झालेली होती. तेव्हा शिवसेना प्रमुख त्यांच्या भाषेत बोलले होते. मला आईचे दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको. हे फार मोलाचे वाक्य आहे. आईचे दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नकोय, तो आज सुद्धा काय, पण उद्या सुद्धा मला शिवसेनेत नको कोणत्याही परिस्थितीत नाही.” यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यसभेच्या पराभवरून म्हणाले, “जेव्हा मी तुम्हाला आमचे म्हणतो, तेव्हा मी तुम्हाला धरलेले आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा माझे सहकारी म्हणून म्हणार नाही. तुम्ही आमचेच आहात, एकही मत फुटलेले नाही. एकही मत फुटलेले नाही. मग फुटले कोणते आहे, त्याचा सुद्धा अंदाज लागले आहे. तोही अंदाज लागलेला आहे. कोणी काय काय कलाकाऱ्या केल्यात आहे ते ही कळाले आहे. आणि त्याचे हळूहळू तसे एक येईल. तसे त्याचा उलघडा होत जाईल. त्यामुळे उद्या फाटा फुटीची चिंता बिलकुल वाटत नाही. कारण आता शिवसेनेमध्ये असा गदार मनाचा कोणी राहिलेला नाही, अजिबात नाही.”

शेराला सव्वाशेर हा असतोच म्हणून जो शेर असतोच

“शेराला सव्वाशेर हा असतोच म्हणून जो शेर असतो. त्यांनी सुद्धा लक्ष्यात ठेवायला पाहिजे की, आज मी शेर आहे पण उद्या कोण तरी सव्वाशेर येणार,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “मला पर्याय नाही, नाही असे अजिबात होऊ शकत नाही. प्रत्येकाला पर्यात असतो आणि हा पर्याय पहिल्या जो काही पहिलाय असतो.  त्याच्यापेक्षा जसा शेराला सव्वाशेर हा असतोच म्हणून जो शेर असतो. त्यांनी सुद्धा लक्ष्यात ठेवायला पाहिजे की, आज मी शेर आहे पण उद्या कोण तरी सव्वाशेर येणार आहे. आताचे राजकारण हे पावशेरचे चालेले आहे. कारण तेवढ्या पुर्ती वेळ मारून न्यायाची आहे. हा जो काही सगळा विचार आहे. तो विचार शिवसेना दे दे पुढे चालेली आहे.”

 

संबंधित बातम्या
बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप! – संजय राऊत

 

 

Related posts

रिझर्व्ह बँकेच्या कामात केंद्राने हस्तक्षेप केलेला चालणार नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत प्रचंड तफावत !

News Desk

परळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे

News Desk