Site icon HW News Marathi

गिरीश बापट यांच्या प्रचारातील सहभागावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | “गिरीश बापट यांना मी भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती चांगली नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांनी पोटनिवडणुकीत प्रचारात सहभागी झाल्यामुळे भाजपवर झालेल्या टीकेवर ते म्हणाले. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात गुरुवारी (16 फेब्रुवारी) गिरीश बापट सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. पुण्यातील प्रचार सभेत गिरीश बापट हे नाकात नळी, बोटाला ऑक्टिमीटर, सोबत ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हीलचेअरवरून आण्यात आले होते. गिरीश बापट यांची परिस्थित पाहून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.

शरद पवार यांना प्रसार माध्यमांनी गिरीश बापट प्रचार सहभागावर प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “गिरीश बापट यांना प्रचारात उतरवणे हे चुकीचे की बरोबर आहे. मला हे माहिती नाही. परंतु, गिरीश बापट यांना मी भेटून आलोय. त्यांची प्रकृती चांगली नाही”, असे म्हणत त्यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले.

कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश बापर यांनी गुरुवारी केसरीवाड्यात मेळाव्यात थोडेसे भाषण केले होते. गिरीश बापट भाषण करताना ते भावून झाले होते. कसब्यात भाजपचा विजय झाल्यावर मी तुम्हाला पेढा भरवायला येईस असा शब्द गिरीश बापट यांनी दिला आहे. गिरीश बापट यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या पक्षाविषयी असलेल्या निष्ठेचे कौतुक केले.

Exit mobile version