HW News Marathi
राजकारण

“तुम्ही तिकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा,” राऊतांचा शिंदे गटाला टोला

मुंबई | शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करून दाखवला आहे. तुम्ही तिकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांना टलावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासह विधान परिषदेच्या सदस्त्वाचा त्याग केला. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. राऊतांनी आज (30 जून) पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर टीका केली.

संजय राऊत म्हणाले  उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असा शब्द बाळासाहेबांना दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. आणि हा शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले असून मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला आहे. परंतु, जे आज आमच्याविरोधात बोलत आहेत. त्यांनी तिकडे जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार आहेत का?,” असे ते म्हणाले.

“शिवसेना पक्षप्रमुखांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला. यापूर्वी महाराष्ट्रातील नाही तर देशाच्या जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात कशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा लागला, उद्धव ठाकरेंनी संयमी आणि सभ्य भाषेत सांगितले असून लोकांनी दगाबाजी केली आहे. त्यांनी पाठीत खंजीर खुपसले हे एकदा सुद्ध झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आल्यानंतर खुर्चीचा चिकटून राण्याचा अर्थ नव्हता,” असे राऊत म्हणाले

संबंधित बातम्या
मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : आता काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणे शक्य नाही !

swarit

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेचे नवे गटनेते

Aprna

अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं !

News Desk