Site icon HW News Marathi

“मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो,” आदित्या ठाकरेंच्या टीकेला सत्तारांचे प्रत्युत्तर

मुंबई | “मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो,” असे प्रत्युत्तर शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांना केले आहे. सत्तारांच्या औरंगाबाद येथील सिल्लोड मदारासंघात आज (31 जुलै) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांचे लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान सत्तारांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका करत म्हटले की, “राजीनामा देऊन परत निवडणूक लडवून दाखवा.”  आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत अब्दुल सत्तार म्हणाले, “आमच्यावर जे टीका करणाऱ्यांनी लक्ष्यात ठेवले, पाहिजे की तुम्ही आपण कुणाचा हात धरून निवडून आलो आहेत. मी त्यांना फक्त ऐवढा सांगतो की, मला शिंदे साहेबांनी आदेश द्यावे, मी लगेच राजीनामा देतो आणि परत निवडून येतो.”

मुख्यमंत्री हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. सत्तार हे जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. यावेळी औरंगबादमध्ये मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत सत्तार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

 

 

Exit mobile version