Site icon HW News Marathi

“मी सगळं मान्य करेन पण…”, जितेंद्र आव्हाडांची विनयभंगाच्या आरोपानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “मी सगळे मान्य करेन, परंतु, विनयभंग मान्य करणार नाही”, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांसोबत आज (14 नोव्हेंबर)  संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर दाखल केल्या गुन्हासंदर्भात बोलताना म्हणाले. आव्हाडांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा पाटलांकडे सुपूर्त केला आहे. जयंत पाटील म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा माझ्याकडे सुपूर्त केला आहे. आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा दिला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आव्हाड म्हणाले, “माझ्यावरचा विनयभंगाचा गुन्हा हा केवळ एक षड्यंत्राचाच भाग आहे. तर ‘हर हर महादेव’ या मराठी सिनेमा बंद पाडण्याच्या प्रकरणात विनाकारण मला न्यायालयीन कोठडीत ठेवले. आणि कालचा हा जो प्रकार झाला होतो एकदम चुकीचा आहे. त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे . मी सगळे सहन करेन परंतु, विनयंभगाचा गुन्हा सहन होत नाही. हे माझ्या काळजाला लागले आहे,” असे ते म्हणाले.

आव्हाडांनी पाटलांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा माझ्याकडे सुपूर्त केला आहे. आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मी आव्हाडांना राजीनामा मागे घ्यावा, त्यांना राजीनामा देण्यापासून मी थांबवण्याचा प्रयत्न केला, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतु, आव्हाडांनी त्यांचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. आता आमच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मी राजीनाम्याचे पत्र घेऊन जाणार आहे. मी शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यावर तेच निर्णय घेतली,” असे ते त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.”

 

 

 

Exit mobile version