HW News Marathi
राजकारण

“मी पुन्हा येईन… या विधानाची टिंगल टवाळी झाली,” फडणवीसांनी सभागृहात टीकास्त्र सोडले

मुंबई | “मी पुन्हा येईन, माझ्या विधानावर माझी टिंगल, टवाळी केली. पण मी आला आणि एकटा नाही आलो तर एकनाथ शिंदेंनाही घेऊन आलो,” अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवणाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचाणीमध्ये विजयी मिळाला आहे. यानंतर फडणवीसांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना महविकास आघाडीवर टीका केली. विधानसभेत आज (4 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे सरकार 164 मतांनी विजयी मिळाला असून महविकास आघाडी सरकारला 99 मतांनी पराभव झाला आहे.

फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार हे अनैसर्गिक सरकार होते. ते फार काळ टिकणार नाही, असे मी म्हटले होते. मी पुन्हा येईल, माझ्या विधानावर माझी टिंगल, टवाळी केली. पण मी आला आणि एकटा नाही आलो तर एकनाथ शिंदेंनाही घेऊन आलो. मी त्यांचा बदला घेणार आहे. माझा बदला एवढाच आहे की, मी त्यांना माफ केले आहे.” असे फडणवीस म्हणाले. पुढे फडणवीसांनी शायरीतून म्हणाले, “दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते… कोशिश करने से हर मुश्किल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नही जाते…”, असे ते म्हणाले.

“एकनाथ शिंदेंनी आमच्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी शिंदेंचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. ज्या सदस्यांनी बहुमत चाचणीचा प्रस्ताव बहुमत चाचणीत विजयी मिळवण्यासाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या आम्हाला सहकार्य केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. शिंदे हे 24 बाय 7 काम करणारे नेते आहेत. शिंदे हे माणुसकी असणारे आणि सर्व सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

 

संबंधित बातम्या
शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही !

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

News Desk

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

Aprna