HW News Marathi
राजकारण

“मी झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” ED ने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “मी झुकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही,” असे वक्तव्य शिवसेनेचे खासदर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना केले आहे. राऊतांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. राऊतांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठे संख्येने हजर आहेत. राऊतांच्या समर्थनार्थ शिवसैनिक घोषणाबाजी करत आहेत.  राऊतांच्या घराबाहेर मोठा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलातील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडी राऊतांच्या भांडूप येथील  मैत्री निवासस्थानी आज (31 जुलै) सकाळी 7 वाजता ईडी दाखल होती.

राऊत ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “खोट्या आणि बनावर आरोप फक्त शिवसेनेला त्रास देण्यासाठी करण्यात आले आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळे दहशतने दाबण्याचे चक्र सुरू आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार, महाराष्ट्र इतका कमजोर नाहीय. आणि शिवसेनाही इतकी कमोजर नाही. खरी शिवसेना काय आहे, हे आज तुम्ही पाहात आहात. महाराष्ट्रला खत्म करत आहेत. संजय राऊत झुकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही.”

शिंदे गटातील लोकांवर तोफ डागली

शिंदे गटात सामील झालेले संजय शिरसाट यांनी तुम्हाला अटक झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारल्यावर राऊत म्हणाले, “पेठे वाटा, महाराष्ट्र कमोजर होतोय, पेठे वाटा पेठे. महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. अरे तुम्ही लोक बेशर्म आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ईडी मला अटक करणार आहेत. आणि मी अटक करून घेणार आहे.”

संबंधित बातम्या

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ; 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

“प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नाहीये”, बच्चू कडू यांचा सूचक इशारा

Aprna

आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही !

News Desk