Site icon HW News Marathi

पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टीकरण देत म्हणाले…

मुंबई | “पंकजा मुंडे आणि भाजपबद्दल असेल कोणीही व्हिडिओ कट करून जर व्हायरल केले ना. इतकी कडक कारवाई करू”, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्हायरवर स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना आधी बोलू न दिला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ हा शनिवारी (21 जानेवारी) बीडमधील गेवराई येथील कार्यक्रमातील आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “खरे तर पंकजा ताईना जानीवपूर्व बदनाम करण्यासाठी एक बीडमध्ये सक्रिय आहे. भाजपमधील संपूर्ण कर्यक्रते, पंकजा मंडे या पक्षाच्या पाठीमागे उभे आहेत. एक विरोधी गट तयार झालेला आहे. ते पंकजा ताईंवर प्रश्न चिन्ह निर्माण करायचे. आणि ते व्हायरल करायचे. आम्ही पक्ष नेतृत्वांनी सांगायचे की, पंकजा ताई पक्षाविरोधात बोलत आहेत. पंकजा ताई त्या ठिकाणी काही तरी वेगळे करत आहेत. खरे तर हा एक गट आहे. त्या गटावर आम्ही कारवाई केली असून पोलीस तक्रार झाली. पोलीस स्ठानकात गुन्हा ही दाखल झाला. आणि यानंतर पंकजा ताईबद्दल असेल भाजपबद्दल असेल कोणीही असे व्हिडिओ कट करून जर व्हायरल केले ना. इतकी कडक कारवाई करू की, त्या ठिकाणी त्यांना पुन्हा हिम्मत होणार नाही.”

काँग्रेस ट्वीटमध्ये काय लिहिले

काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले, “जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपचे संस्कार म्हंटल्यावर असच होणार!”, असे म्हणत व्हिडिओ ट्वीट केला आहे.

व्हायरल व्हिडिमधील मुंडे आणि बावनकुळेंचे संभाषण

बीडच्या गेरवाईमधील कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजा मुंडेंच्या आधी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर गेले. तेव्हा पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणाले, “तुमच्या आधी मी बोलते ना…”, त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना उत्तर देत म्हणाले, “नाही”, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “दोनच मिनिटे बोलते…” यावर पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नाही”. यानंतर पंकजा मुंडे या त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हे हसत राहिले.

संबंधित बामत्या

पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडिओ काँग्रेसने केला ट्वीट
Exit mobile version