Site icon HW News Marathi

‘भीक’ शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो! – चंद्रकांत पाटील

मुंबई | “कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली”, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी ( 9 डिसेंबर) चंद्रकांत पाटील हे आज (9 डिसेंबर) सकाळी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. “आंबेडकर-फुले यांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झालेला असेल तर दिलगिरी व्यक्त करायला माझी काय हरकत नाही”, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आज (10 डिसेंबर) दिलगिरी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “भीक मागून शाळा उभी केली. भीक म्हणजे काय आज आपण जे गणपती, नवरात्रीला, आंबेडकर जयंतीला शिवाजी महाराजांच्या जयंतीला जे जाऊन फिरतो. असे म्हणतो ना जयंती साजरी करायची आहे,” असे हात जोडून सांगितले. ऐ आमची जयंती साजरी करांची पैसे त्या. मी माझ्या खात्यावर जो गंमच्छा होता. तो काढून अॅक्शन घेऊन दाखविले. आणि त्यांनी भीक मागितली की, माझ्या शाळेला पैसे द्या, हातवारे करून त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, या भीक शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी काही छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या मनात श्रद्धा आहे. माझ्या रक्ता रक्तामध्ये आंबेडकर-फुले हे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झालेला असेल तर दिलगिरी व्यक्त करायला माझी काय हरकत नाही.”

छोट्या मनाचा माणूस नाही

“मी इतका छोट्या मनाचा माणूस नाही, तुम्ही छोट्या मनाचे आहेत. तुम्हाला राजकारण करण्यासाठी रोज काही तरी शोधायचे असते. आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील. त्यांनी व्हिडिओ क्लीप पूर्ण ऐकली पाहिजे. माझे भाषण वारकरांना ऐवढे आवढले. मी त्या भाषणात पूर्ण आध्यात्म मांडले”, असे चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिले. “त्या भाषणात संतपिठी, संत साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते वाढवा. ते वाढविताना सरकार पाठिशी आहे,  मी काल 23 कोटी रुपये घोषित केले.  आज हे संजय राऊत फुकटच्या गप्पा मारताय, यांच्या तिजोरीत पैसे आहेत. मी काल 23 कोटी रुपये मी संत पिढाला घोषित केले. आणि असेही म्हटले की, या व्यतिरिक्त तुम्ही लोकांकडेही पैसे मागायला शिका. मी त्या वारकऱ्यांना सीएसआर शब्दाचा अर्थ समजावू सांगितला. एखाद्या कंपनीकडे 5 कोटी रुपयेपेक्षा जास्त नफा झाला तर 2 टक्के त्यांनी सामाजिक कामाला करायचा असतो. त्याला उदाहरण देताना मी म्हटले की, या सगळ्याना संस्था उभ्या करता आल्या नसत्या. हे इतके बोलू नही कोणाच्या डोक्यात शिरणार आहे का?”, असा उलट सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मला निर्दशनासाठी कारण द्याचे नाही

चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करताना ते बरोबर असल्याचेही सांगितले ते म्हणाले, “यानंतर मला एका फार मोठ्या घटना तज्ञाचा फोन आला, ते मला म्हणाले की, ब्रिटिश संसदेपासून मी सगळी पुस्तके काढू बसलोय, कुठे ही भीक हा असवैधानिक शब्द नाही. आपण न्यायालयात म्हणतो की, मी न्यायाची भीक मागतो, आम्ही दयेची भीक मागतो, यात काय चुकीचे आहे. पण, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही. कोणाला यामुळे निर्दशनासाठी कार्यक्रम हवेत ना, निर्दशनासाठी कारण द्याचे नाही. त्यामुळे तुमच्या माध्यमातून आणि हे त्याला दाखवा.”

संबंधित बातम्या

“आंबेडकर-फुलेंनी शाळा सुरु करताना लोकांकडे भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

 

 

 

Exit mobile version